DeD admission sakal
महाराष्ट्र बातम्या

‘डीएड’च्या प्रवेशाला आजपासून सुरवात! 18 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत; 44.50 व 49.50 टक्के गुण घेतलल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षक होण्याची संधी

इयत्ता बारावीच्या निकालानंतर ‘डीएड’ प्रवेशाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ‘डीएड’साठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १८ जूनपर्यंत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या निकालानंतर ‘डीएड’ प्रवेशाला उद्यापासून (सोमवार) प्रारंभ होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ‘डीएड’साठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १८ जूनपर्यंत आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात ‘डीएड’ची अनुदानित सहा तर खासगी २२ महाविद्यालये सुरू आहेत. अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षणाचा खर्च फार येत नसल्याने त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर १९ जून रोजी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर आवश्यकता असल्यास गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. ‘डीएड’ महाविद्यालये जूनअखेर सुरू करण्यात येणार आहेत.

अर्ज करताना विद्यार्थ्यांना किती महाविद्यालये निवडायची याचे बंधन नाही. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार कितीही महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्जात टाकू शकतात. गुणवत्तेनुसार व त्या त्या महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची वाट न पाहता मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) प्राचार्यांनी केले आहे.

‘गुणवत्ता यादी’ची शक्यता धूसरच; प्रवेशासाठी प्रतीक्षा

‘डीएड’चा १०-१५ वर्षांपूर्वीचा सुवर्णकाळ सध्या राहिलेला नाही. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील टॉपर विद्यार्थी ‘डीएड’लाच पसंती द्यायचे, त्यामुळे १०-१२ वर्षांपूर्वी ७५ टक्के गुण मिळालेल्यांनाही प्रवेश मिळायचा नाही. पण, आता मागासवर्गीय प्रवर्गातील ४४.५० टक्के तर खुल्या प्रवर्गातील ४९.५० टक्के गुण घेतलेले विद्यार्थ्यांनाही ‘डीएड’ करता येत आहे. या पार्श्वभूमीवर गुणवत्ता यादी हा प्रकार काही वर्षांपूर्वीच बंद झाल्याची स्थिती आहे. शासकीय महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क तीन हजारापर्यंत तर खासगी महाविद्यालयांचे वार्षिक शुल्क १२ ते २० हजारांपर्यंतच आहे.

पहिल्या, दुसऱ्या वर्षाची ५ जूनपासून परीक्षा

‘डीएड’च्या प्रथम व द्वितीय वर्षात शिकणाऱ्या भावी शिक्षकांची ५ जूनपासून परीक्षा सुरू होत आहे. १७ जूनपर्यंत त्यांची परीक्षा चालणार असून नव्याने प्रवेश घेतलेल्या आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात गेलेल्यांचे शैक्षणिक वर्ष साधारणत: जूनअखेर सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, २०१६ पासून प्रथम व द्वितीय वर्षासाठी इंग्रजी विषय अनिवार्य झाला आहे. दुसरीकडे पूर्वी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाच १५ दिवसांची इंटर्नशिप होती. आता पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांनाही इंटर्नशिप करावी लागते, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT