DEd admission sakal
महाराष्ट्र बातम्या

‘डीएड’ प्रवेशाला आजपासून सुरवात; खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४९.५० टक्के तर मागास प्रवर्गासाठी ४४.५० टक्के गुणांची अट, वाचा...

इयत्ता बारावीच्या निकालानंतर आजपासून (सोमवार) ‘डीएड’ प्रवेशाला सुरवात होणार आहे. जिल्ह्यात २२ डीएड महाविद्यालये असून त्याअंतर्गत एक हजार ६९० भावी शिक्षकांना प्रवेश घेता येणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना ४९.५० टक्के तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ४४.५० टक्के गुण मिळाले आहेत, त्यांना देखील ‘डीएड’ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या निकालानंतर आजपासून (सोमवार) ‘डीएड’ प्रवेशाला सुरवात होणार आहे. जिल्ह्यात २२ डीएड महाविद्यालये असून त्याअंतर्गत एक हजार ६९० भावी शिक्षकांना प्रवेश घेता येणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना ४९.५० टक्के तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ४४.५० टक्के गुण मिळाले आहेत, त्यांना देखील ‘डीएड’ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात सहा अनुदानित व १८ खासगी ‘डीएड’ महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयांमध्ये तीन हजार रुपये आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १२ हजार रुपयांत प्रवेश मिळणार आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन १ जून रोजी प्राथमिक तर ३ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

४ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना ८ जूनपर्यंत प्रवेश घ्यावे लागतील. त्यानंतर ११ जूनला दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन १५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. पुढची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलता येणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक असे...

  • प्रवेश अर्ज : ११ ते २५ मे

  • पहिली प्रवेश फेरी : ४ जून

  • दुसरी प्रवेश फेरी : ११ जून

  • तिसरी प्रवेश फेरी : १८ जून

  • प्रथम वर्षाची सुरवात : २३ जूनपासून

‘डीएड’ला पुन्हा अच्छे दिन

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून दरवर्षी शिक्षक भरती केली जात आहे. आता चालू महिन्यातदेखील शिक्षक भरती होणार आहे. दरवर्षी खासगी अनुदानित शाळा व जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची पदे भरली जातात. दुसरीकडे शिक्षक पात्रता परीक्षा देखील वर्षातून दोनदा होत आहेत. या पार्श्वभूमीवर बंद पडण्याच्या स्थितीतील ‘डीएड’ महाविद्यालयांना पुन्हा अच्छे दिन आले असून गतवर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेश क्षमतेच्या दुप्पट, तिप्पट अर्ज केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघानं इंग्लंडला रोखलं अन् पुढच्या फेरीतही स्थान मिळवलं! इंग्लिश संघाचं आव्हान संपलं

Deputy Collector: राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

SCROLL FOR NEXT