Deepak kesarkar answer to ajit pawar critisism over critisizm to cm eknath shinde devendra fadanvis
Deepak kesarkar answer to ajit pawar critisism over critisizm to cm eknath shinde devendra fadanvis  
महाराष्ट्र

केसरकरांचं अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ४० मंत्र्यांचं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे, दरम्यान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मात्र अजून झालेला नाही. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे दोघे जणच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत अशा शब्दात टीका केली, यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Deepak kesarkar answer to ajit pawar critisism over critisizm to cm eknath shinde devendra fadanvis)

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, अजित पवारांची जी अपेक्षा आहे, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे ४० मंत्र्यांचं काम करण्याएवढे सक्षम आहेत. त्यामुळं आम्हाला कधी शंका वाटत नाही. अजित पवार त्यांच्या जोडीला आहेतच, ते सकारात्मक व्यक्तिमत्व आहेत. राष्ट्रपतींची निवडणूक ही आमची पहिली प्रायोरिटी आहे. तसेच पुराने पीडीत जनता ही आमची पहिली प्रयोरिटी आहे, म्हणून सर्वप्रथम गडचिरोलीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र गेले, असे केसरकर म्हणाले आहेत.

सरकार बदलल्यानंतर नवीन काहीतरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत आहेत असे अजित पवार म्हणाले आहे. मी गॅस वरचा टॅक्स कमी केला होता तेव्हा हे लोकं आमच्याकडे ५० टक्के कर माफ मागणी करत होते मग अत्ता का नाही केला. आज केला असता तर पेट्रोल १७ रुपये स्वस्त झाले असते, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. सरकार बद्दल्या नंतर आम्ही काही करतोय हा केविलवाणा प्रयत्न हे करत आहेत, पेट्रोल डिझेल भाव कमी करण्या मागे नागरिकांना फार फायदा होणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

आपती व्यवस्थापनाला संचालक नाही. अनेक वेळा पुर येतो ढगफुटी होत असते त्यावेळी मदत खात्याला सचिव महत्त्वाचा असतो या सरकारचे हे अपयश आहे. हे दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्या खांद्यावर आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. १६५ आमदारांचे पाठबळ सरकारला आहे, पण कुठे घोडं पेंड खात आहे माहिती नाही, मंत्री मंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहेत, असा सवाल देखील त्यांनी केला.

दीपक केसरकर हे त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी वक्तव्य करताना उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये. यापूर्वी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने सेना फुटली ती मंडळ आयोगाच्या कारणाने हा धादांत खोटा आरोप आहे. शब्दात त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या आरोप फेटाळून लावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT