Devendra Fadnavis and Deepak Kesarkar  
महाराष्ट्र बातम्या

एखाद्या पोलिसाच्या चुकीसाठी फडणवीसांना धारेवर धरणं म्हणजे राजकारण; केसरकरांची प्रतिक्रिया

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील दहा दिवसांहून अधिका काळापासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू आहे. या आंदोलनावर पोलिसांकडून काही दिवसांपूर्वीच लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. यावर सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आली आहे.

केसरकर म्हणाले की, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकून दाखवलं त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या पोलिसाकडून चूक झाली तर फडणवीसांना धारेवर धरणे याला राजकारण म्हणतात. मराठा समाजा इतका संमजस समाज भारतात कोणताही नाही. आंदोलकांना काहीही होऊ नये, यासाठी त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्याची बाब होती. दुपारी ऍडमिट करण्यासाठी पोलीस आंदोलन स्थळी गेले तेव्हा, तेथे अन्य कोणीतरी दगडफेक केली हा एक कट रचण्याचा प्रकार आहे.

केसरकर पुढं म्हणाले की, लाखाचे मोर्चे निघाले, तेव्हा दगडफेक झाली नाही, मग आता कशी होईल याचा विचार जनतेने करावा. मराठा समाजावर लाठीमार झाल्यानंतर पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र तिथे देखील काही जणांनी राजकारण करत टीका केली.आम्हाला जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आहे.जे गुन्हे दाखल झालेले असतात ते मागे देखील घेण्यात येतात त्यासाठी एक कमिटी असते, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT