Deepali Sayed 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेसाठी दिपाली सय्यद यांचं PM मोदींना साकडं!

यासाठी नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी आशा सय्यद यांनी व्यक्त केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जास्तच वाढत जात असताना या दोघांनीही एकत्र यायला पाहिजे अशी आशा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना जोडून लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. यासाठी थेट नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी आशा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.

(Dipali Sayyad On Shivsena)

"शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून मा. नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे." असं ट्वीट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

दरम्यान शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रात्यारोपाच्या फेऱ्या चालू आहेत. बंड केलेले आमदार गद्दार आहेत अशी टीका शिवसेनेकडून केली जात आहे तर आम्ही गद्दारी केली नसून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे आहोत असं सांगितलं जातंय. तर आमच्याकडे बहुमत असल्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह आमच्याकडे येणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. तर पक्षाचं चिन्ह आणि नाव आमचं असणार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे हा वाद वाढत आहे.

हा वाद चांगला नाही शिवसेना तोडून लढण्यापेक्षा जोडून लढायला पाहिजे अशी आशा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधानांकडे साकडं घातलं आहे. शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र येऊन लढावे आणि शिवसेना मोठी करावी असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

Auspicious June 2026: यंदाचा जून महिना धार्मिकदृष्ट्या विशेष; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आजपासून रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन

Mumbai Traffic : मुंबईत प्रवास करताय? LBS मार्गावर 'या' तारखेपर्यंत रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद; घरून निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या

Solapur politics: महायुतीच्या बैठकीत महाविकास आघाडीचे पाच आजी-माजी आमदार; सोलापूरच्या राजकारणात खळबळ, विरोधी गटातील नेत्यांच्या हजेरीने चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT