Deepali Sayed sakal
महाराष्ट्र बातम्या

MNS News : "राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे!"; दिपाली सय्यदांचा खोचक टोला

रोहित कणसे

राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे देखील रस्त्यांच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका करत आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होणाऱ्या मनसेवर खोचक शब्दात टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने त्यांच्या समर्थकांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केली होती. ही घटना देखील बरेच दिवस चर्चेत राहीली. या तोडफोडीवरून सत्ताधारी पक्षांकडून मनसेवर टीका करण्यात आली होती.

त्याचं झालं असं की, अमित ठाकरे त्यांच्या एका दौऱ्यादरम्यान शिर्डीहून मुंबईला जात असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. तेव्हा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी वाद घातल्याचं सांगितलं जात आहे. या वादानंतर २३ जुलै च्या रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. या तोडफोडीवरून शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

"मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा!" असं ट्वीट सय्यद यांनी केलं आहे. दरम्यान दिपाली सय्यद यांच्या या ट्वीटनंतर आता मनसेकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे होणार “आर्थिक ऑडिट”... आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणार

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकरांनी झापल्यानंतर महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस, तर कनिष्ठ अभियंता निलंबित

Nagpur : नागपुरात मेंदूज्वर सदृश्य आजाराचा धोका, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू

Fastag : फास्टॅग नाही किंवा पुरेसा बॅलन्स नाही, काळजी करू नका; UPI द्वारे देऊ शकता टोलचे पैसे  

Cough Syrup Warning : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कफ सिरप, बालकांच्या मृत्यूनंतर सूचना; सर्दी, खोकल्‍याची औषधे बालकांना देऊ नका

SCROLL FOR NEXT