Deepali Sayyad Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

आराम करा, उद्धवजींची सतत आठवण काढू नका; दीपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे लवकरच तुम्हाला भेटायला येतील, असंही सय्यद म्हणाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेतल्या बंडाला त्यांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलंय. तर उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, असंही ते म्हणालेत. यावरुनच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. (Deepali Sayyad on Raj Thackeray)

आपल्या ट्वीटमधून दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, "माननीय लोक आधी बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपूर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावा. आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील, सतत आठवण काढू नये".

शिवसेना मनसेच्या युतीबद्दल एका मुलाखतीत काल राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे विश्वासार्ह नसल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे बोलतात वेगळं आणि करतात वेगळं. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही. बाकीच्या माणसांसाठी मला वाईट वाटतं, पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. तसंच अख्ख्या देशाला आणि राज्याला माहित नाही, इतका जवळून मला उद्धव ठाकरे काय आहे हे माहित आहे, असंही विधान त्यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline: ITR भरण्याची शेवटची तारीख कधी? डेडलाइन चुकली तर भरावा लागेल 5,000 रुपयांचा दंड

NEET-UG री-एग्जामसाठी NTA ची नवी अॅडव्हायजरी! ड्रेस कोड आणि बायोमेट्रिक पडताळणीबाबत महत्त्वाचे निर्देश

Mumbai Local Megablock: मुंबईकरांचा रविवारी प्रवास आरामदायी होणार! लोकल वेळेनुसारच धावणार, का घेतला निर्णय?

Samsungचा नवा AI पेट केअर फीचर! आता फक्त एका फोटोवरून कळणार तुमच्या पाळीव प्राण्याला काय आजार झालाय

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता आठवड्यातून फक्त एक दिवस द्यावी लागणार उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT