

Mohammed Siraj Turns Barber for Sarfaraz Khan
Sakal
India vs Sri Lanka Test Series : भारतीय संघाला १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सध्या श्रीलंकेत असून मालिकेपूर्वी थोडी मजामस्ती करतानाही दिसत आहे.
या मालिकेपूर्वी भारताचे काही खेळाडू नवी हेअरस्टाईल (Hairstyle) करायला गेले होते, यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सर्फराज खानसाठी (Sarfaraz Khan) चक्क न्हावी झालेला दिसला आहे.