Delta Variant Google file photo
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात 'डेल्टा+' ची लागण झालेल्या एकाचा मृत्यू

विनायक होगाडे

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे, ही दिलाशाची बाब असली तरीही आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित 21 रुग्ण आहेत. यापैकी या नव्या व्हेरियंटने संक्रमित 80 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. या रुग्णाला इतरही अनेक सहव्याधी होत्या, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. संगमेश्वरमधील 80 वर्षाच्या महिलेचा या नव्या स्ट्रेनने मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला. याला आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दुजोरा दिला. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतर आजारही होते.

टोपे यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2 तर पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक 1 डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांनी लस घेतली होती का? तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे.

कितपत झालंय संक्रमण?

आतापर्यंत भारतात डेल्टा प्लस विषाणूचे एकूण 40 रुग्ण आढळून आले आहेत. यामधील 15 ते 20 रुग्ण तमिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळून आले आहेत तर या 40 रुग्णांपैकी 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी तर जळगावमध्ये 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडल्याचे कळते. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे हजारो नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईत दिली. याबाबत अधिक माहिती देताना टोपे म्हणाले, ''राज्याने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाहीला प्रारंभ केला आहे आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या संस्थेचा सहभाग यामध्ये आहे. 15 मे पासून 7500 नमूने घेण्यात आले असून त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 जणं आढळून आले आहेत.''

काय आहे डेल्टा प्लस व्हेरियंट?

डेल्टा प्लस व्हेरियंट हा B.1.617.2 स्ट्रेन अर्थात डेल्टा व्हेरियंटचा म्युटंट व्हर्जन आहे. B.1.617.2 या स्ट्रेनचं 'डेल्टा' असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण करण्यात आलं होतं. अधिकृत माहितीनुसार, डेल्टा प्लस व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य आहे. 'डेल्टा प्लस' व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस' व्हेरियंट'च्या निर्मितीबाबत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी 'डेल्टा व्हेरियंट' कारणीभूत होता. त्यातच आता या व्हेरियंटचं आणखी एक म्युटेशन झाल्याचं आढळून आलं आहे. यालाच 'डेल्टा प्लस' किंवा 'AY.1' असं नाव देण्यात आलं आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT