शिवाजीनगर - मॉडर्न महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उदय सामंत. या वेळी (डावीकडून) प्रा. सुरेश तोडकर, डॉ. अरविंद पांडे, डॉ. नितीन करमळकर, डॉ. गजानन एकबोटे, ज्योत्स्ना एकबोटे, सरस्वती शेंडगे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजाररा 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील विद्यापीठांत लोकशाही महोत्सव - उदय सामंत

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘जगात आपली लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. विद्यार्थ्यांनी संविधान आणि लोकशाहीचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी पुढील वर्षापासून राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये लोकशाही महोत्सव सुरू केला जाणार आहे. राज्यपालांकडून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल,’’ अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव या वेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘‘विद्यापीठातून संविधानाचे धडे घेऊन चांगले नेते निर्माण झाले पाहिजेत. लोकशाही म्हणजे काय, हे समजून सांगणारा हा महोत्सव असेल. हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते असावे. वर्षभर राजकारण केल्यास राज्य पुढे जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नये. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा मिळत नाहीत.

त्यामुळे पुणे-मुंबई येथील मोठ्या संस्थांनी ग्रामीण भागात पोचले पाहिजे.’’ डॉ. एकबोटे, डॉ. करमळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti & Hippargi Dam : अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणी पातळी वाढली, कोल्हापूर जिल्ह्याला धोका; माजी आमदार उल्हास पाटील हिप्परगी धरणावर पोहोचले

PV Sindhu: पी. व्ही. सिंधूचा टोकियोत इतिहास! जपान ओपन जिंकत दोन वर्षांचा दुष्काळ संपवला

ChatGPT च्या नावाने का विकले जातायत बास्केटबॉल? कंपनीच्या या प्लॅनचा तुमच्यावर होणार मोठा परिणाम, का? ते वाचा

Live Updates Marathi: कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या गाडीतील चालकाला पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले

Mumbai News: वडघर-मेढा रस्त्यावरील पूल कोसळला, ट्रक आणि कार अडकल्याने मोठा अपघात; अनेक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद

SCROLL FOR NEXT