taharabad.jpg 
महाराष्ट्र बातम्या

'या' गावात डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात डेंगीसदृश रुग्ण असण्याची शक्यता आहे.
       

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ; नागरिकांचा आरोप

ताहाराबाद येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात अनेक दिवसांपासून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबविली गेलेली नाही किंवा ग्रामपंचायतीने औषध वा धूर फवारणी केली नाही. गावात डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबवावी यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी तक्रारी करून देखील सुस्त ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असे नागरिकांनी सांगितले. गावात डासांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, तसेच साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे .तर गावात काही जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

विविध सुविधांपासून वंचित

ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार करून देखील गावातील पाण्याचे डबके तसेच गटारींचे सांडपाण्याचे नियोजन, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरत नाही. त्यामुळे होत असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. तसेच यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना ग्रामपंचायतीकडून होत नसल्याने ग्रामपंचायतीचा कर का भरायचा असा संतप्त सवाल नागरिकांनी करून ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविण्या पाठोपाठ धूर व औषध फवारणी करून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम न राबविल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.

प्रतिक्रिया
"ताहाराबाद गावात अनेक महिन्यापासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे या गावात डेंग्यू चे रुग्ण आढळले आहेत मात्र तरी देखील ग्रामपंचायतिकडून कोणत्याही प्रकारची औषध किंवा धुराची फवारणी मोहीम राबविली जात नसल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे .डेंग्यू आजाराने गावात थैमान घातल्यावर ग्रामपंचायत प्रशासन दखल घेणार का? कि फक्त स्वच्छ भारत अभियानाच्या कमिटीला दाखवण्यासाठी स्वच्छता करण्याचा आव आणार." - डॉ प्रसाद सोनवणे, नागरिक 


 गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. मात्र  ग्रामपंचायतकडून किटकनाशक औषध आणि  धुराची फवारणी मोहीम राबविली जात असुन नागरिकांना जीवन ड्रॉपचे वाटप करण्यात आले तसेच टाकीमध्ये साठवलेले पाणी रिकामे करण्यास सांगितले असून ग्रामपंचायतीकडून योग्य ते नियोजन करून गावात स्वच्छता ठेवण्याचे काम चालू आहे. आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांना प्रत्येक घरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत- स्वप्नील ठोके ,ग्रामविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT