महाराष्ट्र बातम्या

बॅंकांमध्ये अडकल्या ठेवी; शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिक अडचणीत

अनिल सावळे

पुणे : आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या राज्यातील बॅंकांमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे सध्या शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, त्यांच्या ठेवीदारांनाही स्वतः:चे पैसे परत मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.

पतसंस्थांमध्ये बहुतांश नोकरदार, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक, फेरीवाले, हमाल यांच्यासह सामान्य ठेवीदार पैसे ठेवतात. काही पतसंस्था चालकांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले. त्यामुळे काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. यासोबतच गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या काही बॅंकांमुळे पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे पतसंस्थांमधील सामान्य ठेवीदारही अडचणीत आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन सहकारमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी बॅंकांमध्ये शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा झाल्यानंतर पतसंस्थांना ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पतसंस्थांना अद्याप ठेवी परत मिळालेल्या नाहीत.

अशी आहे स्थिती

- रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादलेल्या पंजाब ॲण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेत पतसंस्थांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत - त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १९० पतसंस्थांचा समावेश

- पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत २६ सहकारी पतसंस्थांच्या ८० कोटींच्या ठेवी अडकल्या

- नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत पतसंस्थांच्या सुमारे साडेतीनशे कोटींच्या ठेवी आणि भागभांडवल अडकले

- सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी बॅंकेतही पतसंस्थांच्या सुमारे दीडशे कोटींच्या ठेवी अडकल्या

- कुरुंदवाडमधील एस. के. पाटील बॅंक, सातभाई मर्चंट बॅंकेत ठेवी अडकल्या

- बीड जिल्हा मध्यवर्ती आणि बुलडाणा जिल्हा बॅंकेतही पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या

निर्बंध लादण्यात आलेल्या बॅंकांवर सहकार खात्याचे अधिकारी प्रशासक किंवा अवसायक म्हणून पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. लोकसेवा सहकारी बॅंकेत पतसंस्थांचे पैसे अडकले होते. परंतु पदाधिकाऱ्यांवर विश्वास आणि प्रशासकीय मंडळावर नेमण्यात आलेल्या बॅंक आणि पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांमुळे ठेवीदारांना ८५ टक्के ठेवी परत मिळणे शक्य झाले. त्यामुळे सहकारी बॅंकांवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकीय किंवा अवसायक मंडळात ठेवीदार आणि पतसंस्थांचे प्रतिनिधी असावेत.

- काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT