nairashya 
महाराष्ट्र बातम्या

सावधान ! नोकरी गेल्याने वाढत आहे नैराश्‍य; आरोग्य विभागाने उचलले 'हे' पाऊल

तात्या लांडगे

सोलापूर : तीन महिन्यानंतर आता लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केला आहे. मात्र, संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने उद्योग, व्यवसाय व सरकारी कार्यालयांमध्ये कामगार ठेवण्यावर मर्यादा आणली. तर लॉकडाउनमुळे उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बहूतांश लघू उद्योग बंद पडले आहेत. नोकरी गेल्याने नैराश्‍यग्रस्तांत वाढ झाल्याने आरोग्य विभागाने जिल्हानिहाय मानसिक आरोग्य पथकांची नियुक्‍ती करीत 20 लाख लोकांपर्यंत (कामगार) पोहचण्याचे नियोजन केले आहे. 


राज्यातील काही उद्योग आता सुरु झाले. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेत राज्य सरकार कामगार ठेवण्यावर मर्यादा आणाली. तर टप्प्याटप्याने उद्योग व व्यावसायांना परवानगी दिली जात आहे. मात्र, निर्यातीसह देशाअंतर्गत बाजारपेठा अद्यापही पूर्णपणे खुल्या नसल्याने वस्तूंची अपेक्षित विक्री होत नाही. त्यामुळे बहूतेक उद्योजकांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर नोकरी गेलेल्या व्यक्‍ती नैराश्‍यामुळे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य पथकांद्वारे सोशल मिडियातून व प्रत्यक्ष भेटून मानसिक सल्ला दिला जात आहे. दरम्यान, राज्यातील कोणकोणत्या उद्योगांमधील किती कामगारांची कपात झाली, याचा कामगार विभागाकडून युध्दपातळीवर आढावा घेतला जात असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तर राज्यातील 20 लाखांहून अधिक व्यक्‍तींच्या हाताचे काम जाईल, अशी शक्‍यताही व्यक्‍त करण्यात आली आहे. 


जिल्हानिहाय मेन्टल हेल्थ पथकांची नियुक्‍ती केली 
लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून घरी बसून असलेल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नैराश्‍यग्रस्तांची संख्या वाढत असून मागील अडीच महिन्यांत एक लाख 30 हजार मजुरांचे समुपदेशन केले आहे. आता जिल्हानिहाय मेन्टल हेल्थ पथकांची नियुक्‍ती केली असून त्यांच्या माध्यमातून समुपदशेनाचे स्वतंत्र नियोजन केले आहे. 
- डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य सेवा 


ठळक बाबी... 

  • दिव्यांग, शारिरीक आजार, चिंताग्रस्त, मानसिक दुर्बलता, मतिमंदता, व्यसन असलेल्या नैराश्‍यग्रस्तांची संख्या अधिक 
  • विचार, भावना, कृती भिन्नता अन्‌ नकारात्मकतेच्या तीन लाखांहून अधिक नैराश्‍यग्रस्तांवर सुरु आहेत उपचार 
  • जिल्हानिहाय मेन्टल हेल्थ टिमद्वारे नैराश्‍यग्रस्तांना समुपदेशनाचे स्वतंत्र नियोजन: परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन 
  • व्यक्‍तीगत व सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज: राज्यात समुपदेशानासाठी 150 जणांची टीम 
  • राज्य आरोग्य अभियानाअंतर्गत कोरोनाच्या रुग्णांचेही समुपदेशन: आगामी काळासाठी कायमस्वरुपीचा तयार होतोय आराखडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bhandara News : साकोलीत वाघाचा थरार! उमरझरी शिवारात मिरची तोडणाऱ्या महिलेवर पट्टेदाराचा हल्ला; १० फूट फरफटत नेले, सुदैवाने जीव वाचला

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT