Amol Kolhe esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: शेतकर्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी अजितदादांनी भूमिका घ्यावी; खा. कोल्हेंनी केले आवाहन!

प्रफुल्ल भंडारी

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आदरणीय व मोठे नेते आहेत, त्यांना आव्हान देणार नाही मात्र आवाहन नक्की करत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घ्यावी. लादलेली कांदा निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेण्याची कळकळीची विनंती आहे , असे आवाहन शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात शेतकरी आक्रोश मोर्चा दाखल झाल्यावर पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी हे आवाहन केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी ( शरद पवार गट ), कॅांग्रेस (आय), शिवसेना (उध्दव ठाकरे गट) पक्षाचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाल होते.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार यांनी राज्य सरकारच्या अख्त्यारित दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देणे, बिबट प्रवण क्षेत्रात अखंड वीजपुरवठा करणे, आदी प्रश्नांवर शेतकरी हिताची ठोस भूमिका घ्यावी. राज्यातील सत्तासंघर्ष आणि पक्षाच्या फोडाफोडीनंतर सत्तेचा उन्माद दाखविण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबी यंत्रातून फुलं आणि गुलालाची उधळण करण्यात आली.

आम्ही मात्र शेतकर्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आलो आहोत. भाजप सरकारकडून परकीय गुंतवणूक वाढल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती पाहता फक्त काही उद्योगपतींचे लाखो - कोटी रूपयांची कर्जे माफ होत आहेत. सर्वसामान्य तरूण आणि शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. देशातील व राज्यातील शेतकरी विरोधी सरकार जनता नाकारणार आहे.

आमच्याविरूध्द खोट्यानाट्या केसेस वाढणार : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स व पोलिस यंत्रणेच्या ९५ टक्के धाडी व कारवाया या विरोधी पक्षांच्या लोकांवर झालेल्या आहेत. जशी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येतील तशा आम्हा सगळ्यांच्या विरोधात खोट्यानाट्या केसेस वाढत जातील. त्यासाठी आमच्या मनाची तयारी आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून गुन्हेगारी वाढल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. काळ्या मातीशी इमान राखून कष्ट करणार्या शेतकर्याचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT