Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

ST संप | आता सहनशीलता संपत आलीय,अजित पवारांचा 'अल्टिमेटम'

सकाळ डिजिटल टीम

मागील दीड महिन्यांपासून राज्यात एसटीचा संप सुरू आहे. सरकारने पुन्हा पुन्हा आवाहन केल्यानंतरही कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर कायम आहेत. वारंवार नोकरीवर हजर होण्याचं आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी आंदोलन करत असल्याने राज्य सरकार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.

मागील सोमवारपर्यंत कामगारांना पुन्हा रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यात काहीच बदल झालेला नसल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्र्यांन दिले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहनशीलता संपत चालल्याचं म्हटलंय.

माझी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी कामावर रुजू व्हावं. कोरोनाच्या संकटानंतर आता शाळा सुरू झाल्यात. गरीबांसाठी एसटी म्हणजे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. असं असतानाही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेत, हे बरोबर नाही.

शेवटी एसटी कर्मचारीही (ST Workers Strike) आपलेच आहेत, आणि प्रवासीही आपलेच आहेत. यामध्ये समजूतदार भूमिका घेणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे की, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अनेकदा मुभा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मात्र या सगळ्यांची सहनशीलता संपण्याची वेळ आली आहे. सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे सगळ्या एसटी कामगारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT