Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'फक्त वाट बघा'; मंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीसांचं चकीत करणारं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्यामध्ये शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन सात महिने झाले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सरकारमधील काही आमदारांनी याबाबत जाहीरपणे नाराजी बोलून दाखवलेली आहे. याच मुद्द्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'फक्त वाट बघा' असं चकीत करणारं विधान केलंय.

मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी घेतली. यावेळी फडणवीसांनी नाणार प्रकल्प, मुंबई मेट्रो आणि इतर विकासाच्या मुद्यांवर चर्चा केली. शेवटी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही एक भाष्य केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये याबाबत स्पष्ट सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, तुम्ही फक्त वाट बघा.

फडणवीसांच्या या विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी फक्त 'वाट बघा' असं म्हटल्याने सभागृहातही हशा पिकला होता.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • तीन वर्षामध्ये मुंबई बदललेली असेल. त्याचं कारण मेट्रो आहे. मेट्रो-३ हा ४० किलोमीटरच्या प्रकल्पामुळे १७ लाख प्रवाशी प्रवास करु शकतील.

  • प्रदूषणमुक्त आणि ट्रॅफिकमुक्त मुंबईची संकल्पना आम्ही सत्यामध्ये उतरवणार आहोत. वाढवण बंदरामुळे विकासाला चालना मिळेल, यात अजिबात शंका नाही.

  • नाणार रिफायनरीमुळे कोकणाचा विकास होईल. हा प्रकल्प लांबल्यामुळे नुकसान झालं आहे. ही भारतातली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तब्बल ३ लाख कोटींची ही गुंतवणूक असल्याने रोजगाराला चालना मिळणार आहे.

  • प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा, या प्रवृत्तीमुळे नुकसान होत आहे. मात्र आता ही रिफायनरी आम्ही पूर्ण करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT