Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'मविआचे बडे नेते योग्य वेळी करणार भाजपप्रवेश',फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

सरकारमध्ये कोणताच बदल होणार नसून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील’ फडणवीसांचा दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सत्तांतर झालं तेव्हापासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनेक नेत्यानी या काळात पक्षांतरही केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा नेते वेगवेगळे दावे करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार असल्याचे तसेच अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे असे अनेक दावे दिवसेंदिवस नेते करताना दिसून येतात.

अशातच ‘शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. येत्या काळात सध्याच्या सरकारमध्ये कोणताच बदल होणार नसून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील’, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला आहे. तर ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्यवेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल’, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणं बाकी आहे. त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस यांनी हे नवं राजकीय भाकित केलं आहे.

ते म्हणाले कि,‘उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे त्यांचे सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना परत सत्तेत आणून बसवणार नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे, त्यांच्याही ही बाब लक्षात आली असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य नाही. मात्र, आमच्या भूमिकेनुसार वाटते की निकाल योग्य पद्धतीने लागेल', असं ते म्हणालेत.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आजच मी माझं भाकीत सांगतो, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही’, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT