CM Eknath Shinde with Devendra Fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री फडणवीस अचनाकपणे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा मुख्य चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस अयोध्येला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये भाजपचे बडे नेते रवाना झालेले आहेत. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संजय कुटे आणि मोहीत कंबोज हे फडणवीसांचे विश्वासू शिलेदार दौऱ्यात असतील. त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी चार्टड प्लेन तयार ठेवल्याचं सांगण्यात येत असून लखनौवरुन ते थेट अयोध्येला जातील आणि १२ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत प्रभू रामाची आरती करतील, असं सांगण्यात येतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. तसेच शरयू नदीकाठी महाआरती संपन्न होईल. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगद्गुरु परमहंस आचार्य हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sin Goods In GST: जीएसटी कमी झाला, पण या 'सिन गुड्स' कोणत्या आहेत? ज्या खरेदी करणे होणार महाग

Maratha Reservation: ‘सातारा गॅझेट’च्या नोंदीसाठी प्रयत्न करणार; मराठा समाज बांधवांचा निर्धार, मनोज जरांगे-पाटील यांचेच खरे श्रेय

भीमा नदीच्या पट्ट्यात पुन्हा रक्तपात! ग्रामपंचायत अध्यक्षांची गोळ्या घालून निर्घृण हत्या; राजिउल्लाह, वसीम, फिरोजसह मौलाली अटक

Pitru Paksha 2025: पितृपक्ष सुरू होताच, चुकूनही करू नका 'हे' 6 काम, पितृदोषापासून राहाल दूर

Sangli News: 'शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादीचे शेडगेवाडीत आंदोलन'; काम ११ तारखेपर्यंत बंद

SCROLL FOR NEXT