Maharashtra Assembly budget session  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024 : अजित पवारांच्या बजेटमध्ये विकासाचे कोटी उड्डाण! 'या' विमानतळांसाठी केली मोठी तरतूद

Interim Budget Session 2024: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्यांसाठी सादर केला जात आहे.

रोहित कणसे

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्यांसाठी सादर केला जात आहे. यावेळी राज्यातील वेगवेगळ्या शहरातील विमानतळांच्या सुरू असलेल्या कामाच्या स्थितीचा आढावा देखील अजित पवार यांनी घेतला. यावेळी कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी विमानतळाबद्दलही त्यांनी माहिती दिली.

अहमदनगर येथील शिर्डी विमानतळाचे काम लवकरच सुरू होईल अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. यासोबतच संभाजीनगर येथील विमानतळासाठी ५०० कोटींची तरतूद तसेच कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक निधी दिली जाईल असेही त्यांनी सांगितलं. यासोबतच नवी मु़बई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यत कार्यन्वीत होणार आहे.

अजित पवार म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळाच्या सुमारे ५० हजार चौरसमीटर अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीचे काम लवकरच सुरू होईल. छत्रपती छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठीच्या भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपदान सुरू असून अवाश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. अमरावती येथील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण पूर्ण झालं आहे. येथे रात्रीची विमानसेवा सुरू करण्याची कामे सध्या सुरू आहेत.

नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वीत होईल असेही अर्थमंत्री अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT