ajit pawar Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंचे सरकार सर्वांना एकत्र घेऊन जाणारे - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळासोबत घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आले. त्याबाबत आज अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. काही जिल्ह्यात आदिवासी बहुल जिल्हे असल्यानं तिथं ओबीसींच्या जागांवर परिणाम होतो. त्यांच्यावर अन्याय होतो. आपल्याला जे काही आरक्षण आहे ५२ टक्के आहे. पालघर, नंदुरबार इतर वर्गाला जागा राहत नाहीत. अनेकांचे म्हणणे होते की, जिथं अन्याय होतोय त्याची दुसरीकडे भरपाई करायला हवी असं अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली आधी समिती तयार केली होती. त्यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यावर चर्चा झाली आणि त्यात मार्ग काढला. ज्यांना कुठेही आरक्षण मिळत नाही त्यांनाही जागा ठेवल्या आणि काही जागा ओबीसींना ठेवल्या आहेत असेही अजित पवार यांनी सांगितलं.

राजकीय आरक्षणासाठी वकीलांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यातून एक मत पुढे आलं की जोपर्यंत ओबीसींच्या जागा रिक्त झाल्या आहेत त्याच्या निवडणुका घेऊ नये. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून जाहीर केली. अ्न्याय दूर करण्यासाठी काही निर्णय़ घेतले आहेत. काही निर्णय पटतील काही पटणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, एकमताने सरकारने निर्णय घेतला आहे की, कसं पुढे जायचं याची माहिती दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. उशीरा सुचलेलं शहाणपण अशाही प्रतिक्रिया दिल्या. लोकशाहीने त्यांना अधिकार आहे ते टीका करू शकतात. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार हे सर्व जाती धर्मासाठीचं आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारं सरकारं आहे

अध्यादेश काढायला सांगितलं आहे. निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य आहे आणि त्यात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. ते त्यांच्यापद्धतीने काम करत आहेत. कोणत्याही घटकाला नाराजी राहणार नाही यासाठी प्रयत्न केले तर होऊ शकेल. केंद्राला ५० टक्क्याची अट काढून टाकण्याची आणि राज्याला अधिकार देण्याची मागणी केली पण तसं काही झालं नाही. कोणालाही आरक्षण देताना मूळ आरक्षणाला धक्का लागू नये अशी आमची भूमिका असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

केंद्राने केंद्राचे काम करावे, पण राज्याचे जे अधिकार आहेत त्यावर गदा येऊ नये, राज्याचे अधिकार तसेच रहावेत. मुद्रांक शुल्क आणि जीएसटीमधून राज्याला कर मिळतो. जे काही ठरलंय त्याप्रमाणे चालु रहावे. कोरोनाच्या संदर्भात ज्या सवलती आधी दिल्या आहेत त्या द्याव्यात असंही अजित पवार यांनी सांगितले. पेट्रोल डिझेल संदर्भात काही भूमिका घेतली तर तिथे काही वेगळे मत येऊ शकते. राज्य सरकारचा कर कमी करण्याच्या अधिकारावर जर गदा येत असेल तर आम्ही भूमिका घेऊ असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी ! तुकडेबंदी व्यवहारांच्या नोंदीसाठी कार्यपद्धती निश्‍चित; उल्लंघन करून झालेले व्यवहार नियमित होणार !

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर ओपनिंगला आला... १२७च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा; पण अभिनव तेजराणाची हवा...

संतोष जुवेकर लग्नबंधनात अडकणार? प्रेमाबद्दल बोलताना म्हणाला...'जिथं प्रेम तिथं अ‍ॅडजस्टमेंट...'

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत मुख्यमंत्र्यांच्या ‘स्मरणशक्ती’साठी पंचामृत अभिषेक

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

SCROLL FOR NEXT