Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तिथं गंभीर घडलं असं..

अशा गोष्टी कधी-कधी होत असतात ते फार अडचणीचे आहे असे नाही.

हेमंत पवार

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस कराड येथे येऊन त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

कराड : सातारच्या दोन्ही राजेंशी विकासकामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनंही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण असे नाही की तिथं काही गंभीर घडले आहे.

अशा गोष्टी कधी-कधी होत असतात ते फार अडचणीचे आहे असे नाही, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांच्या वादावर केली.

सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून काल साताऱ्यात झालेल्या राड्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल बुधवारपासून कराड दौऱ्यावर आहेत.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस कराड येथे येऊन त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सुमारे तासभर स्वतंत्ररित्या झालेल्या या चर्चेत सातारा येथील राड्याची चर्चा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, सातारच्या दोन्ही राजेंशी विकास कामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनंही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण असे नाही की तिथे काही गंभीर घडले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांच्या वादावर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT