Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

दोन मंत्र्यांसह 50 जणांना कोरोना; अजित पवारांनी दिली माहिती

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धोका वाढतोय. काळजी घेण्याची गरज आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्यातील दोन मंत्र्यांसह 50 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Covid 19 Positive) आले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) सांगता झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. पाच दिवसीय अधिवेशनाच्या दरम्यान दोन मंत्र्यांसह 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धोका वाढतोय. काळजी घेण्याची गरज आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी केलेल्या प्रचंड गदारोळात विद्यापीठ कायदा (Universities law) मंजूर करत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन पाच दिवसांच्या नियोजनासह पार पडले. या अधिवेशनात काही प्रमाणात गदारोळ झाला असला तरी बऱ्यापैकी मुद्यावर चर्चा झाली. विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान 28 विधेयकांसदर्भात चर्चा झाली. 5 दिवसीय अधिवेशनात 24 विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाली, अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली.

शक्ती विधेयक मंजूर केले गेले. हा सर्वात मोठा मुद्दा होता. बिल आणतात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबनची घटना, मराठी माणसे याबाबत ठराव करून घेतला, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव परिसर विकसित करण्याबाबत ठराव मंजूर केला. छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि विकास यासाठी 150 कोटी नियोजन करण्यात आले. मराठवाडा विदर्भावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. 5 दिवसाच्या अधिवेशनात खूप काम झाले असे म्हणत अधिवेशनात सहकार्य केले त्यांचे आभारही पवारांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT