Narhari Zirwal Esakal
महाराष्ट्र बातम्या

Narhari Zirwal : साहेब, Photo प्लीज! महाराष्ट्रातच नव्हे तर जपानमध्येही नरहरी झिरवळांची क्रेझ

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितला जपान दौऱ्यातील अनुभव

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अत्यंत साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच शांत स्वभावाचे नेते म्हणूनही त्यांचा नाव लौकीक आहे. त्यांच्या पत्नी आजही शेतात काम करतात. त्यांच्या या साधी राहणीमानामुळेच त्यांची महाराष्ट्रात प्रचंड क्रेझ आहे. त्यातच राज्यातील सत्तासंघर्षातील काळातील निर्णयामुळेही ते प्रसिद्धीस आले. तर काही दिवसांपासुन नरहरी झिरवळ यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

त्याच्या या प्रसिद्धीचं कारण म्हणजे नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा पोशाख. झिरवळ यांनी काही दिवसांपुर्वी ट्वीट केलेला एक फोटो. हा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला असून त्याच्याबद्दल नरहरी झिरवळ यांनी एक किस्सा सांगितला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. "माझ्या मतदारसंघातील निळहोंडी पाड्यातील पवार नावाचा व्यक्ती मला जपानमध्ये भेटला. जपानमध्ये गेल्यावर अनेकांनी माझ्यासोबत विमानतळावर आणि हॉटेलमध्येही खूप फोटो काढले. तिकडेही मी प्रसिद्ध आहे असं म्हणावं लागेल.

जपानमध्ये काही लोकं विचारायचे आपण झिरवळ साहेब का? याचा अर्थ ते अंदाजाने ओळखत होते. काही लोकं मला झिरवळ साहेब प्लीज फोटो काढतो. मी इंडियन आहे. मी पुण्याचा आहे. मी अमक्या ठिकाणचा आहे, असं म्हणायचे. माझ्यासोबत फोटो काढायचे. याचा अर्थ झिरवळ तिथेही पोहोचले आहेत, असं नरहरी झिरवळ यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

नरहरी झिरवळ जपानमधील शिस्त आणि स्वच्छतेमुळे प्रचंड प्रभावीत झाल्याचे दिसून आले आहेत. जपानमधील शिस्त आणि स्वच्छतेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. तेथील वॉशरूम, रस्ते, सिग्नल या सर्व गोष्टींचं नरहरी झिरवळ यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे जपानमध्ये आयोजित अभ्यास दौऱ्याला नरहरी झिरवळ आपल्या पत्नीसह गेले होते. तिथल्या एअरपोर्टवरचा एक फोटो झिरवळ यांनी ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये ते गांधी टोपी, पांढरा कुर्ता पायजमा अशा वेशात दिसले तर त्यांच्या पत्नीने नऊवारी साडी डोक्यावर पदर असा अस्सल मराठमोळा पोशाख परिधान केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT