Pradhan Mantri Awas Yojana  sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! १५००० घेऊनही सोलापूरमधील अर्धा लाख लाभार्थींनी घरकुलांचे बांधकाम सुरुच केले नाही; राज्य सरकारचे ५० हजार मिळेनात, २७०० जणांना घरासाठी नाही जागा

सोलापूर ग्रामीणमधील एक लाख एक हजार ६४५ घरकुलांना वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. त्यातील ९२ हजार २२३ बेघर लाभार्थींना घराच्या बांधकामासाठी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील वितरीत झाला. मात्र, त्यापैकी तब्बल ५० हजार ७६८ बेघर लाभार्थींनी पैसे घेऊनही बांधकाम सुरु केले नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर ग्रामीणमधील एक लाख एक हजार ६४५ घरकुलांना वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. त्यातील ९२ हजार २२३ बेघर लाभार्थींना घराच्या बांधकामासाठी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील वितरीत झाला. मात्र, त्यापैकी तब्बल ५० हजार ७६८ बेघर लाभार्थींनी पैसे घेऊनही बांधकाम सुरु केले नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघर लाभार्थींना हक्काचा निवारा मिळतो. त्यासाठी स्वच्छतागृह, मजुरीसह घरकूल बांधकामासाठी दीड लाख रुपये अनुदान मिळते. पण, जिल्हा दरसूचीनुसार ४०० स्क्वेअर फुटातील घरकूल बांधकामासाठी किमान अडीच लाख रुपये लागतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आवास योजनेतून घरकूल बांधणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आता शासन निर्णय होऊन आठ महिने होऊन गेले, पण अद्याप वाढीव अनुदान लाभार्थींना मिळू शकलेले नाही.

वाळू मिळत नाही, सिमेंट, स्टिलचे दर वाढले आहेत. बांधकामाची मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे अनुदान कमी पडून पुढे अडचणी येतील म्हणून लाभार्थींनी पहिला हप्ता घेतल्यानंतरही घराचे बांधकाम सुरु केलेले नाही. त्यात अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर व पंढरपूर या सहा तालुक्यांतील ३२ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. दुसरीकडे अनेक लाभार्थी उसतोडीसाठी व बिगारकामासाठी परगावी स्थलांतरीत आहेत. काहींच्या जागेचा वाद असल्याचे अधिकारी सांगतात.

अधिकारी म्हणतात...

आवास योजनेसाठी आता स्पर्श प्रणाली आली असून त्याअंतर्गत आता पंचायत समितीने लाभार्थींची बिले मंजूर करुन पाठविल्यानंतर राज्य स्तरावर त्याची पडताळणी होते. तेथून ती बिले केंद्राला पाठविली जातात. पण, राज्य स्तरावर बिलांची वेळेत पडताळणी होत नसल्याने तीन महिने झाले, अनेक लाभार्थींना दुसरा हप्ता मिळालेला नाही. पूर्वी, पंचायत समितीचे बिडीओ, सहायक लेखाधिकारी लगेच बिले मंजूर करीत होते. मात्र, आता त्यांच्याकडून बिले लवकर पास होऊन जातात पण राज्य शासनाच्या यंत्रेणेकडून उशीर होत आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकारी सांगतात.

२७०० बेघरांना घरासाठी जागा नाही

राहायला पक्के किंवा स्वत:चे घर नाही, असे जिल्ह्यात सध्या २७०० लाभार्थी आहेत. त्यांना घरकूल मंजूर होऊन १५ हजाराचा पहिला हप्ता मिळाला. त्यांनी जागेची मागणी केली, पण जागा मिळालेली नाही. त्यातील ९०० जणांनी गावठाणापासून २०० ते ५०० मीटरच्या परिघात राहायला असल्याने खासगी जागेच्या खरेदीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. दुसरीकडे त्यांनी जागेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून एक लाखांच्या अनुदानासाठीही अर्ज केले आहेत.

सोलापूर ग्रामीणमधील घरकुलाची स्थिती

  • घरकुलांना मंजुरी

  • १,०१,६४५

  • पहिला हप्ता मिळाला

  • ९२,२२३

  • घरकुलांची कामे सुरु

  • ३१,४५५

  • पहिल्या हप्त्यानंतरही बांधकामे थांबली

  • ५०,७६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT