solapur city

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

‘हाड हाड म्हटले तरी कुत्रा थेट अंगावरच आला’; सोलापुरातील महिला नागपंचमीमुळे हातावर काढत होती मेहंदी, चिमुकल्याच्याही मांडीला चावा; माजी नगरसेवक म्हणाले, ...तर सगळे कुत्रे महापालिकेत सोडू

नागपंचमीपूर्वी वाडिया हॉस्पिटलमागील घरासमोर हातावर मेहंदी काढत बसलेल्या ५० वर्षीय सोजर काटे यांच्या उजव्या हाताचा भटक्या कुत्र्याने लचका तोडला. ‘हाड हाड म्हणून ओरडले तरी कुत्रा अंगावर आला आणि त्याने चावा घेतला’ अशी आपबिती त्या महिलेने सांगितली. तेथून गेलेला तो कुत्रा फॉरेस्टमधील एका व्यक्तीस आणि ताज हॉटेलजवळ खेळत असलेल्या चिमुकल्याच्या मांडीला देखील चावला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नागपंचमीपूर्वी वाडिया हॉस्पिटलमागील घरासमोर हातावर मेहंदी काढत बसलेल्या ५० वर्षीय सोजर काटे यांच्या उजव्या हाताचा भटक्या कुत्र्याने लचका तोडला. ‘हाड हाड म्हणून ओरडले तरी कुत्रा अंगावर आला आणि त्याने चावा घेतला’ अशी आपबिती त्या महिलेने सांगितली. तेथून गेलेला तो कुत्रा फॉरेस्टमधील एका व्यक्तीस आणि ताज हॉटेलजवळ खेळत असलेल्या चिमुकल्याच्या मांडीला देखील चावला. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. जखमी तिघांवर ‘सिव्हिल’मध्ये उपचार करण्यात आले.

सोमवारी (ता. १७) नागपंचमी असल्याने वाडिया हॉस्पिटलमागे राहणाऱ्या सोजर काटे मेहंदी काढत होत्या. त्यावेळी कुत्रा थेट त्यांच्या अंगावर धावला आणि उजव्या हाताला चावला घेतला. त्याला बाजूला सारत असताना कुत्रा गळ्यापर्यंत येत होता, असेही त्या महिलेने माध्यमांना सांगितले. तर अल्जान जहीर शेख या चिमुकल्यासह तो कुत्रा अब्दुल्ला वसीम शेख यांनाही चावला. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

‘...तर कुत्री पकडून महापालिकेत सोडू’ : तौफिक शेख

शहरातील रेल्वे लाइन परिसरातील ताज हॉटेल परिसर, केशव नगर झोपडपट्टी व फॉरेस्ट (वाडिया हाॅस्पिटलजवळ) मोकाट कुत्र्याने तिघांना चावा घेतला. यासंदर्भात महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, माजी नगरसेवक तौफिक शेख म्हणाले, ‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेने नाही केला तर आमचे कार्यकर्ते कुत्रे पकडतील आणि ते सगळे कुत्रे महापालिकेच्या आवारात सोडू. महापालिका सर्वांकडून टॅक्स घेते, मग सर्वांना सुविधा देणे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेवर आहे’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT