Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Election: फडणवीसांच्या निकटवर्तीयाकडे कर्नाटकात खास जबाबदारी; अयोध्या दौऱ्यानंतर मोहिमेवर रवाना

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत तो जिंकण्याचा भाजपचे शर्थीचे प्रयत्न

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील ५४ नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील अनेकल विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तर या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय प्रा. राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर राम शिंदे हे नुकतेच अयोध्या दौऱ्यावरून परतले त्यानंतर आता ते कर्नाटकातील मोहिमेसाठी रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोर लावायला सुरवात केली आहे. त्यासाठी तेथील अवघड वाटणाऱ्या ५४ मतदारसंघासाठी वेगवेगळ्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशभरातील ५४ नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचाही यामध्ये समावेश आहे. या नेत्यांवर वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बंगळुरू येथील १७७ अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आमदार शिंदे यांच्यावर सोपवली आहे. राम शिंदे ही नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. अयोध्या दौऱ्यावरुन परत आल्यानंतर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अनेकल विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

तर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १३ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. तर २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १० मे रोजी मतदान आणि १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT