devendra fadanvis criticize supriya sule over bjp ncp workers clash in pune  
महाराष्ट्र बातम्या

राणांसोबत जे झालं त्यावर गप्प का? फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सवाल

सकाळ डिजिटल टीम

काल पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते यांच्यात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्याने महिला कार्यकर्त्यावर हात उचलल्याचे समोर आले होते, यावरून राजकारण तापलं आहे. याप्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) निशाणा साधला आहे.

काल राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्याने महिला कार्यकर्त्यावर हात उगारला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांच्या संरक्षणात भाजप नेत्यांवर हल्ले करणं, सभांमध्ये आंदोलन करणं, नेत्यांवर अंडे टमॅटो फेकण, केवळ आपलं राज्य आहे आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यामध्ये होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, त्यामुळं पहिल्यांदा तक्रार करू पण कारवाई झाली नाही तर आम्ही देखील सोडणार नाही असे फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी पुरुष कार्यकर्त्याने हात उगारला तर हात तोडू असे विधान केले होते यावर फडणवीस म्हणाले की, सगळ्याच बाबतीत हा निर्णय घेतला पाहीजे, कारण यापुर्वी नवनीत राणांसोबत जे झालं, तसेच त्याआधी महिलांवर हल्ले झाले महिलांना पोलिसांनी वाईट वागणूक दिली त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत, ही भूमिका त्यांनी वारंवार घ्यावी आम्ही स्वागत करू असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय देत ज्या ठिकाणी पाऊस नसेल अशा ठिकाणी प्रलंबित निवडणूकांवर घ्या असे अदेश दिले आहेत, दरम्यान या प्रलंबित निवडणूकांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, सात जूनला मॉन्सून येतो त्यानंतर सगळीकडे पाऊस येतो, त्याआधी निवडणूक आयोगाचं काम संपलं तर निवडणू का घेतील, त्या आधी चर्चा करणे योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT