Devendra Fadanvis critisize subhash desai mva govt over vedanta foxconn  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'सुभाष देसाईंना हे माहिती होतं, तरीही..'; फडणवीसांचे मविआ नेत्यांना प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणार तीन ते चार मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. या आरोपानंतर आजा राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. गुजरातला गेलेला वेदांचा-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मविआ सरकारमध्ये उद्योग मंत्री राहिलेल्या सुभाष देसाईंचं वक्तव्यच देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे.

आमचं सरकार येऊन तिनच महिने झालेत तरीही महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत असा एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टीम हे एकत्रीतपणे महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे असे फडणवीस म्हणाले आहेत.

फॉक्सकॉनबाबत चुकीचा प्रचार केला गेला असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. या संदर्भात बोलताना तत्कालिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही असं स्टेटमेंट दिल होतं याचा फोटोच फडणवीसांनी दाखवला. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्री सुभाष देसाईंना माहिती होतं फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाहीये, तर मग तो गेला तेव्हा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अशी भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं.. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

SCROLL FOR NEXT