devendra fadanvis 
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांची चौकशी पूर्ण; भाजप नेत्यांची बैठक सुरु

सकाळ डिजिटल टीम

फोन टॅपिंग प्रकरणी आज सायबर क्राईमचे अधिकारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीकेसी पोलिस ठाण्याचे पोलिस फडवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले. सहाय्यक पोलिस आयुक्त, वांद्रे सायबर विभाग, नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनखाली ३ पोलिस अधिकारी सागर बंगल्यावर आले. देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी जवळपास दोन तास चौकशी करण्यात आली.

पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत हे चौकशीसाठी सागर बंगल्यावर आले होते. देवेंद्र फडणवीस यांचा १२ वाजल्यापासून जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. डीसीपी हेमराजसिंग राजपूत यांनी जबाब नोंदवून घेतला. जवळपास दोन तासांनी ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. डीसीपी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिस निघून गेल्यानंतर भाजप नेत्यांची सागर निवासस्थानी बैठक सुरु आहे. यामध्ये किरिट सोमय्या, प्रविण दरेकर. अतुल भातखळकर, प्रसाद लाड, नितेश राणे यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.

दरम्यान, त्याआधी फडणवीस यांच्या घरी भाजप नेतेही पोहोचले होते. प्रसाद लाड, नितेश राणे हेसुद्धा उपस्थित होते. प्रवीण दरेकर यांनी फडवीसांना आलेल्या नोटिसीसंदर्भात बोलताना सांगितलं की, फोन टॅपिंग प्रकरणी आज सायबर क्राईमचे अधिकारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत. आधी त्यांना जवाब नोंदवण्यासाठी बिकेसी येथे बोलावले होते. मात्र भाजप आक्रमक झाल्याने आज पोलीस स्वतः त्यांच्या घरी येत आहेत. मात्र हे सरकार बिथरले असून, त्यांना आपण काय करतोय हे कळत नाही असंही दरेकर यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT