Devendra Fadanvis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Devendra Fadanvis: आगामी विधानसभा निवडणुका देखील आम्ही एकत्रित लढू आणि जास्त जागा जिंकू अशा विश्वास भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. फुटलेले पक्ष हे भाजपसोबत गेले. त्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर अनेकदा टीका करत भाजपला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले जाईल असं म्हणत हल्लाबोल केला. अशातच राज्यात महायुतीचे सरकार निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुका होत आहे.

या निवडणुकीत मोठं यश मिळवून आगामी विधानसभा निवडणुका देखील आम्ही एकत्रित लढू आणि जास्त जागा जिंकू अशा विश्वास भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, "गेल्या निवडणुकीवेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी महायुती तेवढ्या जागा निश्चित जिंकेल. तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्ष महायुती म्हणूनच एकत्रित लढू, असंही ते पुढे म्हणालेत.

लोकसभ जागावटपावर बोलताना ते फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अडचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. मात्र ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असे सूत्र असेलच, हे सांगता येणार नाही. आताही भाजपचे ११५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असंही पुढे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना सोबत का घेतलं या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, "शरद पवार यांनी विरोधकांची मोट बांधून भाजपला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अशा वेळी आम्हाला रणनीती आखावी लागली. राष्ट्रवादीत आपल्याला काही भवितव्य नाही अशी अजित पवारांची खात्री झाली होती. आम्हालाही ताकद वाढवायची होती. अशात अजित पवार आमच्याबरोबर आले. शेवटी आम्हालाही राजकारण करायचं आहे. अजित पवार बरोबर आल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची ताकद वाढली".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह; दिवाळी पाडव्यानिमित्त सारसबागेत मोठी गर्दी

CM Yogi Adityanath Decision: सीएम योगींचा मोठा निर्णय: उत्तर प्रदेश पोलीस भरतीत माजी अग्निवीरांना २० टक्के आरक्षण निश्चित!

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; पंतप्रधान मोदींशी व्यापाराबाबत चर्चा झाल्याचा केला दावा

Maharashtra Farmers : केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत, राज्यात ५,८६६ कोटींचा निधी वितरित; लक्ष्मीपूजनानंतरही प्रतीक्षा

Diwali Horoscope : चक्क 71 वर्षानंतर दुर्लभ योग; यंदाचा दिवाळी पाडवा एकदम खास, 'या' 5 राशीच्या लोकांवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

SCROLL FOR NEXT