Devendra Fadanvis Devendra Fadanvis
महाराष्ट्र बातम्या

‘केंद्राकडील डेटा निरुपयोगी; आतापर्यंत हेच सांगत होतो’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) चांगलाच झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम ठेवली आहे. सुप्रीम कोर्टाने इम्पीरिकल डेटाची (Imperial data) अट पूर्ण केली गेली नसल्याचे निकालात स्पष्ट केले. केंद्राकडील डेटा निरुपयोगी आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण गमवावे लागले, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) म्हणाले.

केंद्र सरकारकडे (central government) दोन वर्षे बोट दाखवत वेळ मारून नेला. तेवढ्या वेळात इम्पीरिकल डेटा तयार झाला असता. आमच्याकडे असलेला डेटा अशुद्ध आहे. तो देऊनही काय उपयोग होणार नाही. आम्ही आतापर्यंत हेच सांगत होतो. मात्र, त्याच्या हे लक्षात येत नव्हते. अखेर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण गमवावे लागले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्राने इम्पिरिकल डेटा (Empirical Data) द्यावा ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यावा लागतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर दोन वर्षे टोलवाटोलवी केली. आता राज्य सरकार उघडे पडले आहे. राज्याने ट्रिपल टेस्ट न करता अध्यादेश काढला. तो रद्द केला आहे. न्यायालयाने खुल्या वर्गातून निवडणुका घेण्यास सांगितल्याचेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT