Sharad Pawar-Devendra Fadanvis Sakal
महाराष्ट्र बातम्या

बाबासाहेबांचा आर्टिकल ३७०ला विरोध होता पण...; फडणवीसांचे पवारांवर टीकास्त्र

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, बाबासाहेबांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता पण दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्या विचारांना बाजूला करतोय. आणि बाबासाहेबांच्या विचारावर पवारांचं काय मत आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. असं म्हणत त्यांनी तब्बल १४ ट्वीट करत पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान फडणवीस यांनी तब्बल १४ ट्वीट करत पवारांना संदर्भ दिले आहेत. त्यावरुन ते म्हणतात की, राष्ट्रवादी पक्षाचा संपूर्ण इतिहास आपण पाहिला तर जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यांनी पवारांना बाबासाहेबांच्या सर्व विचारांची आठवण करुन दिली. त्याचबरोबर अनुयायांच्या राजकारणावरुन काही बाबींचे स्मरण करुन दिले. ते म्हणतात की, आज डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून त्यांचा कलम ३७० ला विरोध होता, पण याबाबत राष्ट्रवादीने काय भूमिका घेतली होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे.

काश्मीर फाईल्स चित्रपटावर अलीकडेच शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली. त्याचबरोबर नवाब मलिकांना अटक होताच ते मुस्लीम आहेत असं म्हणत त्यांचे संबंध दाऊदशी जोडले जातात असंही ते म्हणाले. तसंच संविधानात आरक्षणाला विरोध असतानाही मुस्लीम आरक्षणासाठी सातत्याने का पवारांकडून पुढाकार घेतला जात होता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अल्पसंख्यांक समाज कुणाचाही पराभव करु शकतो या विधानाचंही स्मरण त्यांनी यावेळी करुन दिले. इशरत जहॉं ही निर्दोश होती, त्याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली.

त्याचबरोबर हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला? असा प्रश्न विचारत निशाना साधलाय. सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख फडणवीसांनी यावेळी केला. मुंबई बॉम्बस्फोटामध्ये 13 वा बॉंम्बस्फोट हा मुस्लीम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितले होते हा संदर्भही त्यांनी यावेळी दिला. काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? असा प्रश्न विचारत त्यांनी पवारांवर निशाना साधला आहे.

डॉ. बाबासाहेब यांच्या भारतात हे अस्वीकारार्ह आहे असं सांगत त्यांनी तब्बल १४ ट्वीट करत पवारांना त्यांच्या जुन्या बोलण्याचे संदर्भ देत त्यांच्यावर निशाना साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT