devendra fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'आम्ही घरात घुसत... घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही.. ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर फडणवीस भडकले

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी चांगल्याच शब्दांत उत्तर दिलं आहे. "देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे.

आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर ठाकरे यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

फडणवीस यांनी ट्विट करत, 'मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !' असं म्हंटलं आहे. तर 'ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका' असा खोचक सल्ला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.(Latest Marathi News)

तर पुढे देवेंद्र फडणवीस लिहतात की, 'चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर...मुंबईला कुणी लुटले यावर...मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर...मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर...100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर...तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार'.(Latest Marathi News)

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते… असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT