फडणवीस, शेलार  sakal
महाराष्ट्र बातम्या

आशिष शेलार शिवसेनेविरुद्ध बोलतात म्हणून गुन्हा दाखल : फडणवीस

'भाजपचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार कुठल्याही महिलेबाबत अभद्र आणि चुकीचा शब्द वापरू शकत नाही.'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचा (BJP) कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार कुठल्याही महिलेबाबत अभद्र आणि चुकीचा शब्द वापरू शकत नाही. महापौरांबाबत तर कधीच नाही. काल त्यांच्या प्रेसनोटचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आलाय, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. आज ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, की आशिष शेलार शिवसेनेविरुद्ध आक्रमकतेनं बोलतात. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला का? हा प्रश्न आहे. महापौर किंवा कुठल्याही महिलेबाबत आदर आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) चुकीचा शब्द वापरू शकत नाही, अशी बाजू फडणवीस यांनी मांडली. काँग्रेस ने नागपुरात उमेदवार बदलला काय किंवा तोच ठेवला काय, ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Shiv Sena)

काही बाबतीत राजकारणापासून दूर राहीलं पाहिजे. विशेषतः सेनाप्रमुख साडीएस यांचा विषय आहे. तिथे असे लुज वक्तव्य करण्यापेक्षा देशाची सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे. तिन्ही सेना मिळून याची चौकशी करत आहेत. चौकशी होईपर्यंत याबाबत बोलणे अनुचित आहे, असा टोला फडणवीस यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT