मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर सडकून टीका केली होती, त्यानंतर आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर भाषणातून जोरदार टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीत आयपील समजून जर बसत असतील, तर तुम्ही महाराष्ट्र चालवताय ते आयपीएलप्रमाणे मनोरंजनच करतायत, पण माझा प्रश्न आहे तुमचं मनोरंजन सुरुए पण नांदेडमध्ये अतिरिक्त उस विकत घेतला नाही म्हणून ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्याकडे, एसटीच्या 135 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याकडे कोण पाहाणार? ज्या मराठ्यांचं आरक्षण गेलं, ज्या ओबीसीना आरक्षणापासून तुम्ही वंचित केलं यांच्याकडे कोण पाहणार? पाणी आणि वीज मिळत नाही, शेतमजूर आणि बारा बलूतेदारांकडं कोण पाहाणार? तुमचं मनोरंजन चाललंय सामान्य मानसाची होरपळ होतेय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही हे बरं झालं पण जरी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकारी बसले नसते, असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.