devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : ''एका ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी २५ पक्ष एकत्र आले'', OBC परिषदेतून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (वाशिम): नरेंद्र मोदी हे ओबीसी नेते आहेत. परंतु त्यांना संपवण्यासाठी तब्बल २५ पक्ष एकत्र आले आहेत. ओबीसी समाजासाठी मोदींनी अनेक मोठे निर्णय घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु आता काही लोक त्यांना विरोध करत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

भाजपच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, मंडल आयोगाला विरोध करणारे हेच आजचे विरोधक होते. आज देशाचा पंतप्रधान एक ओबीसी आहे. ओबीसींसाठी काम करणारा नेता पुढे येऊन काम करत आहे, मात्र या ओबीसी नेत्याला संपविण्यासाठी 25 पक्ष एकत्र आले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाषणं करीत नाही, तर त्यांच्या योजनांचा लाभ हा खर्‍या अर्थाने एससी, एसटी, ओबीसींना मिळाला आहे. राहुल गांधी सध्या ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून फिरत आहेत. प्रेम हे दुकानात नाही, तर ते मनात असावं लागतं. काँग्रेस प्रेमाचे दुकान काल नागपुरात दिसले, असा टोला त्यांनी लगावला.

कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड,खासदार भावनताई गवळी, मंत्री अतुल सावे,आमदार आशीष देशमुख,माजी खासदार हंसराज अहिर,खासदार वाघमारे,रामदास तडस, आमदार राजेंद्र पाटणी,निलय नाईक,वसंत खंडेलवाल,रणधीर सावरकर,प्रतापदादा अडसड, माजी खासदार अनंतराव देशमुख,माजी मंत्री रणजित पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

काँग्रेसने केवळ 17 टक्के ओबीसींना मुख्यमंत्री केलं

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने आजवर जे मुख्यमंत्री दिले, त्यातील केवळ 17 टक्के ओबीसी होते. मात्र भाजपाने जितके मुख्यमंत्री दिले, त्यातील 31 टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT