Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ...म्हणून अजित पवार महायुतीत;देवेंद्र फडणवीस,कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

‘‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी बरोबर घेण्यामागे सत्ता आणणे हा एकमेव उद्देश नव्हता. राजकारणात कधी दोन पावले पुढे, तर कधी दोन पावले मागे जावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी बरोबर घेण्यामागे सत्ता आणणे हा एकमेव उद्देश नव्हता. राजकारणात कधी दोन पावले पुढे, तर कधी दोन पावले मागे जावे लागते. मी ‘सागर’ बंगल्यावर जावे यासाठी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असताना महाराष्ट्र मागे राहू नये, यासाठी हे परिवर्तन केले’’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अजित पवार यांना महायुतीत घेण्यामागचे कारण स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांना महायुतीत समावून घेतल्याबद्दल पक्ष कार्यकर्ते आणि भाजपच्या मतदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतही त्याचा फटका पक्षाला बसला असल्याचे निरीक्षण पक्षाकडून नोंदविले गेले आहे.

या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने फडणवीस यांनी पवार यांना युतीत सहभागी करून घेण्यामागील निर्णयाचे कारण देत त्यावर पडदा टाकून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

आमच्याकडून काही चुका झाल्या, त्या तुम्ही पोटात घेतल्या पाहिजेत, असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘‘आम्ही नेते असलो, तरी कार्यकर्तेच आहोत. आमच्याकडूनही काही चुका होऊ शकतात. त्यावर चर्चा करून नकारात्मकता निर्माण करण्यापेक्षा त्या सोडून द्या, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. विष कालविण्याचे काम करू नका. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळतात, म्हणून आत्मविश्‍वास गमवू नका’’, असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

फडणवीस म्हणाले...

  • तुमच्या मनात काही प्रश्‍न आहेत, ते काढून टाका

  • महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे

  • भाजपमध्ये नव्वद टक्के कार्यकर्ते हे आपल्याला जीवनात काहीच मिळणार नाही, हे लक्षात घेऊन काम करतात

  • वर्षांनुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आपण संघर्ष केला. आज त्यांच्याबरोबरच सलगी केली. त्यामागे जे ध्येय आहे, ते स्पष्ट आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT