Ajit Pawar Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

Anil Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी ‘अजित पवारांना सोडून जाणारे पहिले आमदार अनिल पाटील असतील’ असा दवा केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. ऊर्फ चंद्रकांत पाटील भेट घेतली. त्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी ‘अजित पवारांना सोडून जाणारे पहिले आमदार अनिल पाटील असतील’ असा दवा केला आहे. त्यानंतर आज नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘अनिल पाटील भाजपमध्ये येत असतील तर चांगलंच आहे,’ असे विधान केले. त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला सपाटून मार खावा लागल्यानंतर महायुतीमधील विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातूनच पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत ते आमदार पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संबंधित आमदारांची जयंत पाटील यांच्याशी भेट झाल्याबद्दल दुजोरा दिला आहे. मात्र, ही भेट योगायोगाने झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटात काहीतरी घडामोडी घडत असल्याचे या घटनांवरून दिसत आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. उर्फ चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, त्या भेटीनंतर अनिल पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटील यांनी ‘अजित पवारांना सोडून जाणारे पहिले नेते अनिल पाटील असतील’ असा दावा जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना केला, त्यामुळे अनिल पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

एकीकडे अनिल पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्या चर्चा होत असताना आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर चांगलंच आहे’ असे उत्तर देऊन त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीलाच सुरुंग लावण्याचे ठरविल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2026

Crispy Rava Paneer Corn Pockets: नॉनव्हेजला ब्रेक, पण चवीला नाही! श्रावणात वीकेंडला बनवा हा कुरकुरीत नाश्ता

SCROLL FOR NEXT