Devendra Fadnavis announced  national memorial of Chhatrapati Shivaji Maharaj  in Delhi
Devendra Fadnavis announced national memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in Delhi  
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : दिल्लीत होणार छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक; फडणवीसांनी केली घोषणा!

रोहित कणसे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज तिथीनुसार ३५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमीत्ताने राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमीत्ताने छत्रपती उदयन राजे यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहीजे हे देखील सांगितलं. आम्ही मावळे आहोत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पंतप्रधान मोदींकडे जाऊ आणि महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे झालं पाहिजे ही भावना निश्चित पूर्ण करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सहा शहरात होणार उद्याने

पुढे बोलताना, राज्यातील प्रत्येक प्रमुख सहा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित उद्याने ५०-५० कोटी रुपये खर्च करून तयार करणार आहोत. त्याच सोबत भरत गोगावले यांची शिवसृष्टीची मागणी आहे. त्याला देखील मी समर्थन देतो आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी शिफारस करतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

Canada: हरदीप सिंग निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाची मोठी कारवाई; तीन भारतीयांना अटक

SCROLL FOR NEXT