Budget Book Publishing Sakal
महाराष्ट्र बातम्या

Budget 2023 : "अर्थसंकल्प सोप्या भाषेत" पुस्तक फडणवीसांचं अन् प्रकाशन झालं होतं ठाकरेंच्या हस्ते

आज राज्याचा २०२३-२४ सालचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics: आज राज्याचा २०२३-२४ सालचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अर्थसंकल्पाचे सादरीकरण होत आहे. पण अर्थसंकल्प ही संकल्पना सामान्य जनतेला समजण्यासाठी क्लिष्ट असते.

तर सामान्य जनतेला अर्थसंकल्प समजावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०२० साली 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षनेते होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबतची युती तोडून महाविकासा आघाडीची स्थापना केली होती.

"अर्थसंकल्पात मांडले जाणारे आर्थिक नियोजन सर्वसामान्य जनतेला कळाले पाहिजे या हेतूने तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिले होते. अर्थसंकल्पातील पैसा सामान्य जनतेचा असतो. तर अर्थसंकल्पाची भाषा सोपी असावी, पण अर्थसंकल्पातील काही परिभाषांना पर्याय नसतो, त्या परिभाषा सामान्य जनतेला कळाव्यात या हेतूने हे पुस्तक लिहिलं असून त्याचा सामान्य जनतेला फायदा होईल" असं मत यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.

४ मार्च २०२० रोजी या पुस्तकाचे प्रकाशन विधानभवनात करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले होते. तर या सोहळ्याच्या तीन महिन्यापूर्वी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. तर विरोधात असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

या सोहळ्यासाठी तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नीलम गोऱ्हे आदी नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT