devendra fadnavis atal bihari vajpayee memories share picture
devendra fadnavis atal bihari vajpayee memories share picture  sakal
महाराष्ट्र

वाजपेयी फडणवीस पितापुत्रांना म्हणाले, 'दोन वाघांच्या मध्ये मी उभा आहे'

Kiran Mahanavar

सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटलं आहे. रोज नवनवीन आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंनी पेट्रोलमध्ये ७ पैशांची वाढ झाल्यावर संसदेत बैलगाडी मोर्चा काढणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींचे उदाहरण देत त्याकाळचं आदर्श राजकारण व तशी भारतीय जनता पार्टी आज उरली नसल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना त्याच शब्दात उत्तर देखील दिलं. आजही आपला पक्ष अटलजींच्या मार्गावरच जातोय आणि देवेंद्र फडणवीस हे अटलजींना आपला आदर्श मानतात असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा आपल्या व अटलजींच्या अनेक आठवणीजागवल्या आहेत. अशीच एक आठवण त्यांनी अटलजींच्या निधनानंतर सांगितली होती.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म  22 जुलै 1970 ला महाराष्ट्रातील नागपुर मध्ये एक मध्यमवर्गीय  परिवारात झाला. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे अनेक वर्षे नागपूर पदवीधर विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांचाच आदर्श घेऊन देवेंद्र पण राजकारणात आले. नगरसेवकपदापासून राजकीय कारकीर्द सुरु केली आणि पुढे नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊन आमदार झाले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. 

अटल बिहारी वाजपेयी जी या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी फडणवीस यांना आकर्षणाचे रुपांतर कधी श्रद्धेत झाले कळलंच नाही. देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत बोलतात, एकदा अटलजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता. आजही तो हात मला आधारासारखा वाटतो, कामासाठी ऊर्जाही देतो, निराश झालो तर सांभाळून घेतो.

अटलजींच्या निधनाची बातमी कळताच फडणवीस सुन्न झाले होते. त्यावर फडणवीस एकदा बोलताना म्हणाले, अटलजींच्या निधनानंतर स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण आतून तुटलो होते. अटलजींच्या आजही कितीतरी आठवणी मनात दाटून येत आहे. असाच एक किस्सा म्हणजे अटलजीं एकदा नागपूरला आले होते. देवेन्द्रजी तेव्हा लहान होते. त्यांना वाजपेयींच्या सोबत फोटो काढायचा होता. पण त्यांची हिम्मत होत नव्हती. त्यांनी वडिलांनाही तस सांगितलं होत. पण काही कारणास्तव देवेंद्र फडणवीस यांना त्या दिवशी फोटो काढता आला नाही.

फडणवीस यांनी त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रमोदजींकडे हट्ट केला की, अटलजीं सोबत फोटो काढायचा आहे. प्रमोद महाजन व देवेंद्र फडणवीस यांचं गुरुशिष्याचं नातं होतं. महाजन हे अटलजींचे देखील लाडके होते. देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट पूर्ण करायचं महाजनांनी मनावर घेतलं. त्यानंतर प्रमोदजींनी अटलजींना बाजूला घेऊन विनंती केली. त्यावर अटलजींनी होकार दिला. आणि त्याचवेळी फडणवीस याचे वडील पण तेथे आले. गंगाधर फडणवीस आल्यानंतर अटलजी त्यांना उद्देशून म्हणाले '‘दो शेरो के बिच मे मै खडा हू’'. अटलजींचे ते शब्द आणि त्यांचं कौतुक ऐकून देवेंद्र फडणवीस अक्षरश: भारावून गेले. ते क्षण ते आजही विसरलेले नाहीत. पुढे झालेली अनेक आंदोलने, आपली भाषणे, मुख्यमंत्री म्हणून चालवलेला कारभार, विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना अटलजींच्या आदर्शाची जबाबदारी आपण पार पाडतो असं त्यांचं म्हणणं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT