Budget Session 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session : शिंदेंच्या मदतीला धावले फडणवीस; कांद्याच्या प्रश्नावरुन विरोधकांचा गोंधळ

संतोष कानडे

मुंबईः विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी पडलेल्या कांद्याच्या भावावरुन सरकारला धारेवर धरलं. सरकार शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करीत नसल्याचा आरोप भूजबळांनी केला.

भूजबळांच्या मुद्द्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र बोलत असतांना विरोधकांनी एकच गोंधळ सुरु केला. मुख्यमंत्र्यांना विरोधी आमदार बोलू देत नव्हते. तिकडून अध्यक्ष सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करीत होते. मात्र कुणी शांत बसत नव्हतं. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांना सर्वांना ऐकून घेण्याचं आवाहन केलं.

मात्र विरोधक काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. मग फडणवीसांचाही रागराग झाला. तुम्हाला सरकारच्या कांदा धोरणासंदर्भात माहिती असेल तुम्हीच बोला, आम्ही बसतो. असं म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आश्वासन दिलं आहे.

'कांदा निर्यातीवर कसलीही बंदी नाही. नाफेडने कांदा खरेदी केली आहे. हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर सरकार त्यासंदर्भात मदतीचा निर्णय घेईल' असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विरोधकांच्या गदारोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावल्याने चर्चा पुढे सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT