Rahul Gandhi and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधी सावरकरांच्या केसाऐवढे देखील होऊ शकत नाहीत - देवेंद्र फडणवीस

Sandip Kapde

Devendra Fadnavis :  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे 'मृत्युंजयाचा आत्मयज्ञ' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेच्या फडणवीसांनी समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना वीर सावरकरांच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकत नाही. अत्याचार सहन करताना सावरकर यांनी इतर कैद्यांसाठी देखील संघर्ष केला. हजारो, लोखो देशभक्त तयार करण्याचे काम खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले.

त्यामुळे राहुल गांधी जन्मात देखील सावरकर होऊ शकत नाहीत. राहुल गांधी सावरकरांच्या केसाऐवढे देखील होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही (राहुल गांधी) मी सावरकर नाही हे सत्य बोलता त्याबद्दल मी आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते -

राहुल गांधी सतत वीर सावरकर यांच्यावर टीका करत असतात. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो यात्रेत  विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केले होते.  

सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी म्हणाले, सावरकरांनी  इंग्रजांना पत्र लिहिले होते की मला तुमचे सेवक व्हायचे आहे. घाबरून त्यांनी माफीनाम्यावर सही केली होती, असे करून त्यांनी महात्मा गांधी आणि इतर नेत्यांचा विश्वासघात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT