politics google
महाराष्ट्र बातम्या

खासदार राऊत नागपुरात आले तर त्यांना सुबुद्धी येईल; फडणवीसांचा टोला

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं कारण समजलं पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच महाराष्ट्र पोलिस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र त्याला १२ तासही लोटले नसताना पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप्रपत्यारोप आणि सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं कारण समजलं पाहिजे. प्रशासकीय चुक झाली, की अजून काही मुद्दे आहेत. मागील वेळेचे १० डिपींचे बदली आदेश थांबवले आहेत. नंतरच्या बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते समोर आलं. आताही तसा काही प्रकार आहे का? असा सवालही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. आज ते नागपूर मध्ये बोलत होते.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याविषयी फडणवीस म्हणाले, नागपूरच्या मातीत वातावरणात वेगळेपण आहे. त्यामुळे ते नागपुरात आले तर त्यांना सुबुद्धी येईल. अमरावतीत इंग्रजांचं राज्य चालायचं तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. त्याठिकाणी लांगूलचालन सरकारचे मंत्री करत असल्यानं परिस्थिती आणखी वाईट होत आहे. या लांगूलचालनमुळे दोन समाज एकमेकांपुढे उभे राहत आहेत. आज जी परिस्थिती आहे तिथे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे म्हणून तणाव वाढत आहे. त्यामुळे हे थांबवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. आम आदमी पार्टीचे लोक बकवास करत असतात. त्यांना काय उत्तर द्यायचे ते पाहू. कोरोना काळात मंत्र्यांनी कोरोनासाठीचा उपचार खर्च सरकारी तिजोरीतून घेतला याबाबत कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी पोलखोल प्रकरणाविषयी ते म्हणाले, पोलखोल आम्ही रोज करतो. ज्यांची पोलखोल होते ते अस्वस्थ आहेत. अस्वस्थ होऊन ते आमच्या रथावर हल्ले करत आहेत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही पोलखोल करणे थांबवणार नाही. पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं तर पोलिसांचीही आम्ही पोलखोल करु, अशा इशाराच त्यांनी पोलिस खात्याला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT