Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

AIMIM ऑफरबाबत शिवसेनेच्या भूमिकेकडं भाजपचं लक्ष : देवेंद्र फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

'भाजपला हरवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत.'

मुंबई : भाजपला (BJP) हरवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनता भाजलाच कौल देणार आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) हे आमच्यासोबत होते. परंतु, काही कारणास्तव ते महाविकास आघाडीत सामील झालेत. तसेच भाजपसोबत कोण असणार कोण नाही, याचा आम्हाला कोणताही फरक पडत नाहीय. त्याचबरोबर एमआयएमची महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हातमिळवण्याची ऑफर आहे. मात्र, शिवसेना कोणती भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे, असं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी : इम्तियाज जलील

एकीकडं भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे, तर दुसरीकडं ओवैसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवलीय. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलंय. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केलीय. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडं लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आलीय. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT