कोल्हापुरातील निवडणुकीत 'बिग बॉस' फेम बिचुकलेसह करुणा शर्मा मैदानात

Kolhapur North Assembly By-election
Kolhapur North Assembly By-electionesakal
Summary

जाधव यांच्या निधनामुळं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे.

Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Kolhapur North Assembly By-election) जाहीर झालीय. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली असून या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी रंगत येत असून या रणांगणात आता करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि साताऱ्याच्या अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी देखील उडी घेतलीय.

Kolhapur North Assembly By-election
काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार? माजी प्रवक्त्याकडून 'या' नावाची शिफारस

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुक होणार आहे. जाधव यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी घोषणा काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी निश्चित करून भाजपा (BJP) कामालाही लागलंय. दरम्यान, कॉंग्रेसकडून आमदार चंद्रकांत जाधव (Congress MLA Chandrakant Jadhav) यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणूक रिंगणात असणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून कोण असेल याची उत्सुकता होती. सत्यजित कदम यांच्या रूपानं भाजपानं तगडा उमेदवार मैदानात आणलाय.

Kolhapur North Assembly By-election
अभिनेते शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजप देणार तगडा उमेदवार

भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजपाचा आमदार नसल्याची खंत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना होती, ती भरून काढण्यासाठी आता भाजपानं कंबर कसलीय. काँग्रेसही कोल्हापूर उत्तर मतदार संघ आपल्या हातातून जाऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित आहे. तसेच काँग्रेस बरोबरच पंजाब निवडणुकीत सत्ता आल्यानं आत्मविश्वास वाढलेल्या आप ही संदीप देसाई यांना रिंगणात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलंय. आपनं तर प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केलीय. या तिन्ही उमेदवाराबरोबरच करुणा शर्मा या शिवसंग्राम पक्षाच्या वतीनं लढणार आहेत. महिलांच्या हक्कासाठी त्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. एवढच नव्हे, तर आतापर्यंत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेलं साताऱ्याचे अभिजित बिचुकले ही रिंगणात असणार आहेत.

Kolhapur North Assembly By-election
'केजरीवालांनी अण्णा हजारेंशी गद्दारी केली म्हणून आपचा जन्म झाला'

पंढरपूर-मंगळवेढ्यात बिचुकलेंना मिळाली होती अवघी 137 मतं

'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या (Pandharpur-Mangalvedha Assembly constituency) पोटनिवडणुकीत अवघी १३७ मतं मिळाली होती, त्यामुळं प्रतिस्पर्धी उमेदवार लाखांवर मतं घेत असताना आमदारकीचं स्वप्न पाहणारे बिचुकलेंना फक्त १३७ मतांवरच समाधान मानावं लागलं होतं. त्यांचा हा स्कोर वरळी विधानसभा निवडणुकीतल्या मतांपेक्षा कमी आहे. म्हणून, या निवडणुकीत त्यांचं पुन्हा एकदा डिपॉझिट जप्त झालं होतं. आता बिचुकले कोल्हापुरात आपलं भवितव्य आजमावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com