devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : आश्चर्य! शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारं ट्वीट फडणवीसांनी डिलिट केलं

संतोष कानडे

मुंबईः शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यांनी त्यांचं ट्वीट डिलिट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चात उत आला आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फारकाही बरं चाललंय, असं म्हणता येणार नाही. कल्याणमधील असहकार ठराव आणि एकनाथ शिंदेंच लोकप्रिय, असं सांगणाऱ्या जाहिराती, यामुळे वातावरण बदललेलं आहे. त्यातच आज एका घडामोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक ट्वीट केलं होतं. ''हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने वाटचाल करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! राज्यभरातील शिवसैनिकांनासुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा!'' असं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं.

मात्र काही वेळानंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आलेलं आहे. एकतर शिवसेनेचा वर्धापनदिन उद्या आहे. त्यामुळे ट्वीट डिलिट केल्याचं सांगितलं जातंय.

मात्र आदित्य ठाकरे यांनी केलेली टीका लक्षवेधी आहे. ''उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जाहिरातीची एवढी धास्ती घेतली आणि कदाचित दिल्लीहून आलेल्या आदेशामुळे आजच त्यांना ट्वीट करावं लागलं'', असं आदित्य ठाकरे म्हणाले. फडणवीस यांनी खरंच धास्ती घेतली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? 48 तासांत 3 मोठे निर्णय, 'आरबीआय'नेही दिला इशारा, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

प्रत्येक रंगाची एक किंमत आहे: हिंदी ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी- बदले का खेल’चा ट्रेलर

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT