Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : देवेंद्र फडणीस तातडीने दिल्लीला रवाना! मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग?

रोहित कणसे

राज्यात मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान शिंदे गटातील चार ते पाच मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपकडून दबाव असल्याचे देकील विरोधकांकडून बोलले जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

शिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभेचं जागा वाटप कसं होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यावर या भेटीत चर्चा केली जाऊ शकते. तसेच यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या अमित शाहांसोबतच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. साम टिव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला आता वेग आला असून याच पार्श्वभूमीवर फडणवीस हे दिला रवाना झाला आहेत. फडणवीस हे नागपूरला जाणार होते, अशी चर्चा होती. मात्र ते ऐनवेळी दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होईल असे बोलले जात आहे.

दरम्यान शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या आमदारांना संधी मिळणार याचा निर्णय घेण्यात येईल. मात्र आमदार जास्त असल्याने भाजपला जास्त मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील किती आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT