Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: 'माझा एक फोन, बच्चू कडू गुवाहाटीला'

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्याच्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis deputy chief minister press confrence: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्याच्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केले आहे. यावेळी फडणवीस यांनी शिंदे सरकावर फेक नॅरिटिव्ह तयार केले जात असल्याचे म्हटले आहे. याशिवाय राज्यातून जे प्रकल्प बाहेर गेले आहेत यावरही फडणवीस यांनी भाष्य केले आहे. आमच्याविरोधात वेगळ्या प्रकारचे षडयंत्र तयार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी तर आपल्यावर सातत्यानं खोके घेतल्याचा आरोप होत असल्याचे म्हटले होते. यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच खुलासा करावा अशी त्यांनी मागणी होती. आमदार रवी राणा आणि कडु यांच्यातील वादाच्या पेटलेल्या ठिणगीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. यासगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलले आहेत.

देवेंद्र यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे भूमिका मांडत आपल्या बोलण्यावर कडु हे गुवाहाटीला गेल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवरुन वाद रंगला होता त्याच्याशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली आहे. मी फोन केला आणि आमदार बच्चु कडू हे गुवाहाटीला गेले. असे फडणवीस यांनी सांगताच वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचे सोशल मीडियावर दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT