महाराष्ट्र बातम्या

"...तर साहित्य संमेलनात कशाला जायचे?'' फडणवीसांची नाराजी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (marathi sahitya sammelan) निमंत्रण पत्रिकेवर नाशिक जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांचे नाव नाही. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संमलेनाचे निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला होता. साहित्य संमेलनासाठी अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. मात्र आता देवेंद्र फडणवीस आज (ता.४) साहित्य संमेलनास हजेरी लावण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाबाबत खळबळजनक ट्विट केले आहे. काय म्हणाले फडणवीस..

साहित्य संमेलन - फडणवीसांची नाराजी

मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?

या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव

केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Reservation: ओबीसी बचाव आंदोलनाची धार बोथट! पाच नेत्यांच्या पाच भूमिका; काही पक्षात अडकले, काहींना इगो प्रॉब्लेम?

Shocking : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यात चाहत्यांना रस राहिला नाही? तिकीट विकल्याच जात नाही, कारण काय तर...

Nepal Protests: भारतात लष्करी शिक्षण घेणारा व्यक्ती होणार नेपाळचा सर्वेसर्वा, Gen Z च्या तांडवानंतर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Updates : शेतात काम करताना दुर्दैवी घटना, इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून जागीच मृत्यू

Adani: साडेसात हजार कोटी द्या! अदाणींची ‘परिवहन’कडे मागणी, राज्य शासनाचे ५०० कोटी बुडणार; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT